अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता


जळगाव (रविवार, 26 जुलै 2026) : नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा यांच्यातर्फे लहान मुलांच्या नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आराध्य भूषण खैरनार याने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावत विजेतेपद पटकावले.

केसीईच्या आयएमआर कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार आराध्य भूषण खैरनार (अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव), उत्कृष्ट पुरस्कार राम पुष्कराज चौधरी (स्कायविन इंटरनॅशनल स्कूल), उत्तम पुरस्कार राजरत्न रणजित पारधे (कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर) तर प्रशंसनीय पुरस्कार अथर्व अतुल पाटील (उज्ज्वल इंग्लिश मिडीयम स्कूल) यांनी पटकावले आहेत. स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ संगीतकार दुष्यंत जोशी व किरण सोहळे यांनी काम पाहिले.

विजेत्या स्पर्धकांना परिक्षक, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, मोहित पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन विनोद ढगे तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !