पगार बिल काढण्यासाठी लाच : नंदुरबारचा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe for processing salary bill : Nandurbar headmaster caught in ACB trapभुसावळ (सोमवार, 27 जुलै 2026) : प्रसूती रजा, बालसंगोपन रजा फारकाची दोन बिले तसेच तीन महिन्यांच्या वेतनाशी संबंधित बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी दोन हजार 350 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नंदुरबार जिल्ह्यातील भादवड येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास मधुकर पाटील (54) यांना नंदुरबार एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सोमवार, 27 रोजी आश्रमशाळेतच यशस्वी करण्यात आली. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील लाचखोर प्रचंड हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
नंदुरबार एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भादवड (ता.नंदुरबार) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत नोकरीस आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रसूती रजा, बालसंगोपन रजा तसेच तीन महिन्यांच्या वेतनाशी संबंधित बिलांवर स्वाक्षरी करण्यासाठी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी दोन हजार 350 रुपयांच्या लाचेची मागणी मुख्याध्यापकांनी 24 रोजी केली होती. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल करून लाच पडताळणी करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सोमवार, 27 जुलै 2026 रोजी विसरवाडी येथे सापळा रचला. यावेळी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी आश्रमशाळेतच तक्रारदाराकडून तीन हजार 350 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करणयात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदाल देवराम गावीत, जितेंद्र महाले, संदीप खंडारे, हेमंत महाले, सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.
एसीबीचे नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल.