जळगाव मराठा विद्या प्रसारक मंडळातील वाद : अ‍ॅड.विजय पाटील जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

बनावट लेटरहेड तयार करून शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी कारवाई


Dispute at Jalgaon Maratha Vidya Prasarak Mandal:  Adv. Vijay Patil in the custody of Jilhapeth Police जळगाव (सोमवार, 27 जुलै 2026) : मराठा विद्या प्रसारक मंडळात भोईटे आणि पाटील गटातील वाद सर्वश्रृत असून या प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल आहेत. त्यातच या संस्थेचे बनावट व खोटे लेटरहेड तयार करून विविध शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अ‍ॅड.विजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी अ‍ॅड.पाटील यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

मराठा विद्या प्रसारक वाद
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 228/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 336(2), 336(3), 338, 340 व 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
फिर्यादी निलेश रणजित भोईटे (46, भोईटे नगर, जळगाव) हे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या., जळगावचे मानद सचिव आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष व सहसंचालक कार्यालय, जळगाव यांना आणि 4 मे 2026 रोजी नाशिक येथील सहाय्यक आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांच्या कार्यालयाला संबंधित संस्थेच्या नावाने बनावट व खोटे लेटरहेड वापरून पत्रव्यवहार करण्यात आला. अ‍ॅड.विजय भास्कर पाटील (रा.दीक्षीतवाडी, जळगाव) यांनी स्वतःला संस्थेचा अध्यक्ष म्हणून संबोधत संस्थेचे बनावट लेटरहेड तयार करून त्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यापूर्वीही पोलिसात गुन्हा
दरम्यान, पोलीस नोंदीनुसार विजय भास्कर पाटील व इतरांविरुद्ध यापूर्वीही जिल्हापेठ पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 393/2024 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन संबंधित आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. तपास सहा.निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !