रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3030 च्या ‘योगपर्व 2026’ स्थापना समारंभ गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रतिनिधीत्व
जळगाव (मंगळवार, 28 जुलै 2026) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3030 आयोजित ‘योगपर्व 2026’ स्थापना समारंभात प्रतिनिधीत्व करीत उत्साहाने सहभाग नोंदविला. हा समारंभ रविवार, 26 जुलै 2026 रोजी साताना (जि. नाशिक) येथील सूर्या लॉन्स, तरहाबाद रोड येथे झाला.
महाविद्यालयाच्या जान्हवी सोनवणे,रोशनी भाट,क्रिस्टिना डी’सूझा आणि अविनाश डोईफोडे यांनी प्रा. निलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.या समारंभात रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3030 च्या नव्या नेतृत्वाची स्थापना करण्यात आली.
नेतृत्व विकास, मैत्रीभाव आणि निःस्वार्थ सामाजिक सेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणार्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहभागातून सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल संस्थेच्या पदाधिकार्यांनी, प्राचार्यांनी व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.