बिल काढण्यासाठी 48 हजारांची लाच : धारगावातील सरपंचपती, ग्रामसेवकासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
₹48,000 bribe to process a bill: Three arrested by ACB, including a Sarpanch’s husband and a Gram Sevak from Dhargaon नाशिक (बुधवार, 29 जुलै 2026) : ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी 48 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना ग्रामसेवक, सरपंच पती व खाजगी पंटराला नाशिक एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने ग्रामपंचायत वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.
अटकेतील आरोपींमध्ये ग्रामसेवक बाळू अंतु मांगटे (45, धारगाव, ता.ईगतपुरी), सरपंच पती पांडुरंग देवराम पूजारा (23, धारगाव, ता.ईगतपुरी) व खाजगी पंटर शांताराम सोनू पागीर (38, धारगाव, ता.ईगतपुरी) यांचा समावेश आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांना धारगाव, ता.ईगतपुरी ग्रामपंचायतीत ई निविदेद्वारे 13 लाख 70 हजारांची कामे मिळाली होती. मुदतीत सर्व कामे पूर्ण केल्यानंतर पाच कामांचे बिल नऊ लाख 70 हजार 833 रुपये निघाले होते मात्र काढून दिलेल्या बिलांच्या मोबदल्यात पाच टक्के लाच ग्रामसेवक बाळू मांगटे यांनी मागितल्यानंतर 13 रोजी तक्रार देण्यात आली व लाच पडताळणी करण्यात आली. लाच मागणीला सरपंच पती व खाजगी पंटराने प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्यानंतर 28 रोजी सापळ्यात तिघांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक योगेश शिंदे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.