हिंगोणा शेत-शिवारात शेतात काम करताना 45 वर्षीय महिलेस सर्पदंश
45-year-old woman bitten by a snake while working in the fields at Hingona यावल (गुरुवार, 30 जुलै 2026) : यावल तालुक्यातील हिंगोणा या गावातील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय महिलेला शेत-शिवारात काम करताना डाव्या हाताला सापाने दंश केला. ही घटना बुधवारी घडली. महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

अचानक झाला दंश
हिंगोणा, ता.यावलच्या रहिवासी मनीषा अरुण वायकोळे (45) या बुुधवारी शेतात कामाला गेल्या असता त्यांच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, अधिपरिचारिका पूजा मेढे, चंद्रकला कोल्हे यांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान शेत शिवारात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प निघत असतात तेव्हा सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी केले आहे.