शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : धुळे व नाशिक जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी करणार्या एमपीतील चोरट्यांना बेड्या
चार किलो चांदीच्या आभूषणांसह 7.83 लाखांचा मुद्देमाल जप्त : सहा गुन्ह्यांची उकल
Shirpur city police take drastic action: Thieves from MP who were stealing from temples in Dhule and Nashik districts are arreste शिरपूर (शुक्रवार, 31 जुलै 2026) : धुळ्यासह नाशिक जिल्ह्यात मंदिरांची टेहळणी करून देवी-देवतांच्या अंगावरील दागिण्यांची चोरी करणार्या मध्यप्रदेशातील सराईत चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांनी बेड्या इोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून विविध मंदिरांमधून चोरीस गेलेले एकूण सात लाख 83 हजार 400 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले तर तब्बल सहा गुन्ह्यांची उकलही झाली आहे.

सदीम गिलदार देवका (27, नवाडफल्या, मोहाला, ता.सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) व भिकला रामसिंग देवका (39, नाहल्याफल्या, मोहाला, ता.सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सावळदेत झाली होती चोरी
शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील दत्त मंदिराची दानपेटी फोडून 22 हजारांची रोकड चोरून नेण्यात आली व या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, खबर्यांचे नेटवर्क व गोपनीय माहितीद्वारे आरोपींपर्यंत यंत्रणा पोहोचली.
हा ऐवज झाला जप्त
शिरपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून 19 हजार 300 रुपयांची रोकड, चांदीचा घोडा, 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे 78 घोडे, चांदीचे पाच मुकूट, तीन चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री व नाग तसेच लोखंडी टॉमी, स्पॅनर व पेंचीस आदी मिळून सात लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहा गुन्ह्यांची उकल
या आरोपींनी शिरपूर शहरासह धुळे व नाशिक जिल्ह्यात सहा चोर्यांची कबुली दिली आहे. त्यात शिरपूर शहरातील शहादा रोडवर, सावळदे येथील झोपडीत, सावळदे येथील दत्त मंदिरात तसेच धुळ्यातील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळील रामदेव महाराज मंदिर, सटाणाजवळील साईबाबा मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन, अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, अनिता पावरा, चित्रा पावरा व आरसीपी पथकाने केली.