आंतरजातीय विवाहाचा वाद : डोक्यात दगड टाकलेल्या जामनेर तालुक्यातील तरुणाचा अखेर मूत्यू


Inter-caste marriage dispute : Youth from Jamner taluka, struck on the head with a stone, finally passes away जामनेर (शुक्रवार, 31 जुलै 2026) : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग डोक्यात ठेवून संतप्त तरुणीच्या भावाने मेहुण्याच्या डोक्यात दगड टाकला होता. गंभीर जखमी अवस्थेतील जामनेर तालुक्यातील वडगावच्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अटकेतील आरोपीविरोधात आता खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. प्रशांत सुभाष चौधरी (29) असे मृताचे तर अभिषेक संतोष मोरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी आणि आरोपीची बहीण यांनी काही काळापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग आरोपी अभिषेक मोरे याच्या मनात होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून आरोपीने प्रशांतवर दगडाने जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात प्रशांत चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फत्तेपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या घटनेमुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !