चोपडा तालुका हादरला : नराधम पित्याच्या हल्ल्यात मुलगी जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी
Chopda Taluka Shaken : Daughter Killed Instantly, Son Critically Injured in Attack by Monstrous Father चोपडा (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : गाढ झोपेत असलेल्या दोघा अल्पवयीन मुला-मुलीवर नराधम मद्यपी पित्याने कुर्हाडीचे सपासप वार केले. या हल्ल्यात गाफील असलेल्या 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत. ही संतापजनक घटना चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे घडली. मीरा सुभाष भिलाला असे मयत मुलीचे तर रामू सुभाष भिलाल असे जखमी मुलाचे नाव आहे. आरोपी सुभाष गोपाल भिलाला यास पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष गोपाल भिलाला (55) याने रविवारी पहाटे आपल्या घरात झोपलेल्या मुलांवर अचानक कुर्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला हिचा मृत्यू ओढवला तर मुलगा सुभाष गोपाल भिलाला हा जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
खुनानंतर आरोपी जंगलाच्या दिशेने फरार झाला. माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे एपीआय प्रशांत कंडारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून जंगल परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला तीन मुलगे व तीन मुली असून त्यापैकी दोन मुलगे आणि दोन मुलींचे विवाह झाले आहेत. आरोपीची पत्नी मायाबाई सुभाष भिलाला (48, सत्यम पार्क, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.