बामणोदला विहिरीत डोकावताना तोल गेल्याने सावद्यातील महिलेचा मृत्यू
Woman from Savda dies after losing her balance while peering into a well in Bamanod यावल (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील बामणोद येथे 38 वर्षीय महिला विहिरीत डोकावत असताना तिचा तोल गेला आणि पाय घसरून ती पाण्यात कोसळली. ही घटना सोमवारी घडली. तातडीने तिला विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्योती धनराज बेंडाळे (35, रा.सावदा, ता.रावेर) असे मृत महिलेचे नाव आहे.

तोल गेला अन् महिला कोसळली
सावद्यातील ज्योती बेंडाळे या विहिरीत डोकावत असताना अचानक त्यांचा पाय घसरला व त्यात विहिरीत बुडाल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून महिलेला मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सोनवणे करीत आहे.