भुसावळात धावत्या मालगाडीखाली सापडून अनोळखी तरुणाचा मृत्यू

ओळख पटविण्याचे लोहमार्ग पोलिसांचे आवाहन


भुसावळ (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात धावत्या मालगाडीखाली सापडून अंदाजे 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मृताची ओळख पटविण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

लूप लाईनमध्ये झाली दुर्घटना
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजेपूर्वी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या अप प्लॅटफॉर्म क्रमांक णकलगत असलेल्या मालगाडी लूपलाइनमध्ये हा तरुण धावत्या मालगाडीखाली सापडला. गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी 8.10 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत तरुणाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट, मध्यम बांधा, सावळा वर्ण व गोल चेहरा आहे. त्याने कथ्थई रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपँट आणि नारिंगी रंगाची अंडरवेअर परिधान केली होती. प्राथमिक तपासात तो बेघर असून प्लास्टिकच्या बाटल्या वेचण्याचे काम करत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संबंधित व्यक्तीची ओळख किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !