जळगाव तालुक्यात भीषण अपघात : भरधाव टँकरने पिकअपला उडवले : नशिराबादच्या तरुणाचा मृत्यू


Horrific accident in Jalgaon Taluka :  Speeding tanker rams into pickup; youth from Nashirabad killed जळगाव (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : भरधाव वेगाने आलेल्या टँकरने पिकअपला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअपमधील नशिराबादच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नशिराबाद टोलनाका परिसरात बुधवारी घडला. सोनू रामा बागले (29, भवानी नगर, नशिराबाद) असे मृताचे नाव आहे.

असा घडला अपधात
साकेगाव येथून दिवसभराची मजुरी करून पिकअप वाहनाने सोनू बागले हा तरुण निघाला असतानाच नशिराबाद टोलनाका परिसरात भरधाव वेगाने आलेल्या टँकरने पिकअपला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेमुळे पिकअपमधील सोनू बागले रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मागून येणारा ट्राला त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच चिरडले गेले. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. सोनू बागले हे हातमजुरी आणि बांधकामावर बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !