शिक्षण घेताना ओळख, लग्नाच्या आमिषाने भुसावळातील तरुणीवर तीन वर्ष अत्याचार : आरोपीसह माता-पित्यांविरोधात गुन्हा
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या तरुणीची स्थानिक तरुणाशी पुण्यात शिक्षण घेताना ओळख वाढून जवळीक वाढली. तरुणाने तरुणीशी लग्न करण्याचे आमिष देत तब्बल तीन वर्ष शारीरीक संबंध ठेवले मात्र लग्नास नंतर नकार दिल्याने तरुणीने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तरुणासह त्याच्या माता-पित्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण ?
भुसावळातील 21 वर्षीय तरुणीची शहरातील आदित्य ब्रजेश वत्स याच्याशी ओळख असल्याने दोघे पुण्यातही शिक्षणासाठी सोबत असल्याने त्यांच्यात जवळीक वाढली व संशयीत आदित्याने तरुणीला लग्नाचे वचन देत तिच्याशी जवळीक वाढवून शारीरीक संबंध ठेवले. ऑगस्ट 2023 ते जुलै 2026 या कालावधीत तरुणीसोबत भुसावळातील तरुणीच्या घरात तसेच पुण्यात शिक्षण घेत असताना तरुणीवर अत्याचार करण्यात आला.
दुचाकीसाठी रक्कमही घेतली
आरोपी तरुणाने पल्सर दुचाकी खरेदीसाठी तरुणीकडून 30 जून 2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने सुमारे 1 लाख 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत आहे. 12 जुलै रोजी लग्नाबाबत विचारणा केल्यावर आदित्यने विवाहास नकार दिल्याने तरुणीने बाजारपेठ पोलिसात धाव घेतली.
या संशयीतांविरोधात गुन्हा
21 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून संशयीत आदित्य ब्रजेश वत्स, संशयीताचे वडील ब्रजेश कुमार सिंह व आई सीमा ब्रजेशकुमार सिंह (रा.मेघ मल्हार सोसायटी, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.
