चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई : मालेगावातील चोरट्याला चोरीच्या दुचाकीसह अटक
धुळे (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने घरासमोरून चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावत मालेगावातील संशयिताला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 30 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
आठ दिवसात चोरीचा छडा
धुळ्यातील मजीद मुसा शहा (नुरानी मशिदीजवळ, धुळे) यांची होंडा युनिकॉन (एम.एच.18 एस.बी.1525) ही 30 जुलै 2026 रोजी रात्री 11.55 ते 31 जुलै 2026 रोजी रात्री 12.30 या कालावधीत लकबॅक हॉटेल समोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहा.पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोहम्मद इस्तेयाक अहमद अन्सारी (रमजानपुरा, मालेगाव, जि.नाशिक) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली 30 हजार रुपये किंमतीची होंडा युनिकॉन मोटारसायकल जप्त करण्यात आली.


यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विवेक पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस अंमलदार निलेश देवरे, सिराज खाटीक, राकेश मोरे, धीरज सांगळे, इंद्रजीत वैराट आदींच्या पथकाने केली.
