अमळनेरसह दहिवदला दोघांची आत्महत्या


Two commit suicide in Amalner and Dahivad अमळनेर (शनिवार, 8 ऑगस्ट 2026) : अमळनेर तालुक्यातील दहिवद तसेच अमळनेर शहरातील वाडी चौकात दोघांनी गळफास घेतला.

दहिवद येथील राहुल दत्तात्रय सोनार (29) याने 5 रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर गळफास घेतल्याची माहिती प्राप्त होताच गावातील दत्तात्रय सोनार, शिवाजी पारधी, प्रवीण माळी, चेतन माळी, रोशन यांनी त्याला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनल नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.




दुसर्‍या घटनेत वाडी चौकातील दीपक विठ्ठल गुरव (52) याने स्वतःच्या राहत्या घरात छताला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यांच्या शालकने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !