यावल शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : 35 वर्षीय संशयिताला अटक


यावल (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : यावल शहरातील एका भागातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 35 वर्षीय तरुणाने विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी घडली होती. हा प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबीयास सांगितल्यानंतर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीलाअटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
शहरातील एका भागातहू 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयीत शेख इम्रान शेख सुभान (35) याने चाकुचा धाक दाखवला घरी नेत विनयभंग केला. घडलेला प्रकार या मुलीने आपल्या कुटुंबियास सांगितल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !