नंदुरबार गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : धुळ्याकडे येणारे तीन टँकरमधील एक कोटींचे बायोडिझेल जप्त

युपीसह राजस्थानातील चालकांना बेड्या : वाहन व बायोडिझेलसह दोन कोटी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त


Nandurbar Police Seize 1.28 Lakh Litres of Biodiesel; 3 Tankers Worth ₹2.17 Crore Confiscated नंदुरबार (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : गुजरात राज्यातून विसरवाडीमार्गे धुळ्याकडे बायोडिझेलची वाहतूक होत असताना
तीन टँकरवर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत एक लाख 28 हजार लिटर बायोडिझेल, तीन टँकर व तीन मोबाईल असा एकूण 2 कोटी 17 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी युपीसह राजस्थानकातील तीन चालकांना अटक करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
शनिवार, 8 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. गुजरात राज्यातून सुरत ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून विसरवाडीमार्गे धुळ्याच्या दिशेने बायोडिझेलची वाहतूक करणारे तीन टँकर जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ सापळा रचला. रात्री सुमारे 11.30 वाजता संशयास्पदरीत्या जाणार्‍या तीन टँकरची तपासणी करण्यात आली.





टँकरमध्ये बायोडिझेल आढळले
यावेळी टँकर (क्रमांक जी.जे.12 बी.डब्ल्यू.7829, जी.जे.12 बी.डब्ल्यू.4947 व जी.जे.12 सी.टी.9537) ची तपासणी केली असता त्यामध्ये बायोडिझेल असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित चालकांकडे बायोडिझेल वाहतुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे व परवान्याबाबत चौकशी करण्यात आली. तपासणीदरम्यान आवश्यक बाबींमध्ये संशयास्पद परिस्थिती आढळल्याने पोलिसांनी तिन्ही टँकर ताब्यात घेतले. या कारवाईत एक लाख 28 हजार लिटर बायोडिझेल, तीन टँकर आणि तीन मोबाईल असा एकूण 2 कोटी 17 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तीन संशयित ताब्यात
या प्रकरणात बाबूलाल नरसिंगराम बिश्नोई (49, रा.भुनिया, ता.सेंडवा, जि.बाडमेर, राजस्थान), गुमानराम रुपाराम जाट (38, दिनगड, ता.चौथान, जि.बाडमेर, राजस्थान) व संतोष राध्येश्याम सिंग (36, रा. पुरा हरलाल, ता.बाह, जि.आग्रा, राज्य उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली असून तिन्ही संशयितांविरुद्ध विसरवाडी पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मोहन ढमढेरे, रामेश्वर चव्हाण, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, रवींद्र अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !