भुसावळात दोन वेळा बियर शॉपी फोडली : अमळनेरातील संशयीत शहर पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात संशयीताविरोधात नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात वाईप शॉप फोडल्या प्रकरणी गुन्हे


Bhusawal Beer Shop Robbed Again in Two Months; Repeat Offender from Amalner Arrested भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : भुसावळातील यावल रोडवरील बिअर शॉपी फोडण्यात आल्याची घटना दोन महिन्यात दुसर्‍यांदा घटना घडली होती. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर अमळनेरातील कुख्यात संशयीताला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शांताराम उर्फ शन्या प्रताप कोळी (40, रूबजी नगर, अमळनेर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. आरोपीविरोधात नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात वाईन शॉप फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

असे आहे चोरी प्रकरण
भुसावळातील यावल रोडवर बलवंतसिंग बहादुरसिंग पटेल (55, अकलूद, ता.यावल) यांचे पटेल बिअर शॉपी नामक दुकान आहे. यापूर्वी 7 मे 2026 रोजी याच दुकानातून चोरट्यांनी 10 हजार रुपये लांबवले व गुन्हादेखील दाखल झाला होता तर याच दुकानात 30 जूनच्या रात्री 10 ते 1 जुलैच्या सकाळी नऊवाजेदरम्यान पुन्हा चोरीचा प्रकार समोर आला होता. आरोपीने गल्ल्यातील सहा हजारांची रोकड लुटली तर ओळख न पटण्यासाठी पाच हजार रुपये किंमतीच्या डीव्हीआरही चोरून नेला होता. त्यावेळी पटेल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





गोपनीय माहितीवरून कारवाई
शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी शांताराम उर्फ शन्या प्रताप कोळी (40, रूबजी नगर, अमळनेर) यास अमळनेर शहरातून अटक केली आहे. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून यापूर्वी त्याने नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात वाईन शॉप फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील नाईक रज्जाक खान, कॉन्स्टेबल राहुल भोई, दीपक पाटील आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार दीपक विक्रम पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !