यावल शहरातील विरार नगरात वीज चोरी : एकाविरोधात गुन्हा


यावल (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : यावल शहरातील विरार नगर भागात एका घरात वीज चोरी झाली. हा प्रकार विद्युत वितरण कंपनीकडून तपासणी मोहिमेत उघडकीस आला. संबंधित व्यक्तीने एक हजार 467 युनिट विजेची चोरी केल्याने विद्युत वितरण कंपनीच्या वतीने त्याला 29 हजार 740 रुपयाचा दंड आकारत दंड भरण्याचे सांगितले मात्र, संबंधित व्यक्तीने वेळेत दंड अदा न केल्याने यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
शहरातील विस्तारित भागात विरार नगरात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रवीण विठ्ठलराव सूर्यवंशी याच्या घरी विद्युत कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणी केली असता त्यांनी विद्युत वितरण कंपनीचे तब्बल एक हजार 467 युनिट वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. सूर्यवंशी यांना 29 हजार 740 रुपयांचा दंड आकारून दंड आदा करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या मात्र संबंधिताने वेळेत दंड अदा केला नाही म्हणून त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विशाल किनगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !