भुसावळ तालुक्यात अल्पवयीनावर अत्याचार : चौकडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीनावर चार प्रौढांसह एका अल्पवयीनाने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीना व्यतिरीक्त अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली.
मनोहर रामा पाटील (65), मधुकर विश्वनाथ भारंबे (64), नारायण सोमा चौधरी (50) व विनायक वसंत पाटील (52, सर्व रा.भुसावळ तालुका) यांना अटक करण्यात आली.



पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या 13 वर्ष व नऊ महिने वयाच्या मुलीवर अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिला खाऊ साठी पैसे देण्याचे आम्हीच दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिचे लैंगिग शोषण करण्यात आले. चारही आरोपींना अटक करण्यात आली.