दीपनगर प्लांट परिसरातून 15 किलो तांब्याची तार लांबवली : दोघांविरोधात गुन्हा


भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : दीपनगर औष्णिक केंद्राच्या सोलार प्लांट परिसरातून 10 हजार 500 रुपये किंमतीची सुमारे 15 किलो तांब्याची जुनी वापरातील तार चोरून नेण्यात आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान दिपनगर औष्णिक केंद्रातील 500 मेगावॅट प्रकल्प परिसरात ही चोरी झाली. 500 मेगावॅट प्रकल्पातून 600 मेगावॅट प्रकल्पाच्या दरम्यान असलेल्या सोलार प्लांट परिसरातून अज्ञात व्यक्तींनी तांब्याची तार चोरून नेल्याचे समोर आले.






या प्रकरणी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी बंडू रतन पातोडे (44, रा. दीपनगर कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून दीपक संजय जयतकर (28) व शैलेश अशोक तुसकर (30, दोघे रा.फेकरी, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही संशयितांनी फिर्यादीच्या परवानगीशिवाय व लबाडीच्या उद्देशाने 15 किलो तांब्याची तार चोरून नेली. चोरी केलेला माल घेऊन जात असताना दोघे मिळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तांब्याच्या तारची अंदाजे किंमत 10 हजार 500 रुपये आहे.

तपास हवालदार योगेश भानुदास पालवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !