कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने अंजनविहिरेत चोरी : धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची उकल

अल्पवयीन ताब्यात तर मुख्य संशयीताचा कसून शोध


Anjanvihire Lock Repair Theft धुळे (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : घरातील कुलूप व कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या भामट्यांनी दुरुस्ती सुरू असताना घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लांबवल्याचा प्रकार शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे गावात घडली होती. समांतर तपासात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने चावी बनवणार्‍या अल्पवयीनाला ताब्यात घेताच त्याने चोरी केलेले दागिने काढून देत हा गुन्हा आपले काका पातालसिंग शिकलीकर (एकता नगर, नंदुरबार) यांनी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 49 हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त केले असून मुख्य संशयीताचा शोध सुरू केला आहे.

लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने चोरी
अंजनविहिरे गावात कपाटाचे व कुलूप दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या संशयीतांनी दत्तू लोटन पाटील यांच्या घरात कपाटाचे लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला. यावेळी घरात पाटील यांच्या पत्नीच असल्याने आरोपींनी नजर चुकवून कपाटातील दागिण्यांची चोरी केली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने समांतर तपासात चोरी उघडकीस आणली.





एलसीबीच्या पथकाने अल्पवयीनाला घेतला ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिले तसेच बॅगेतील दाग्यिांनी चोरी त्याचा काका पातालसिंग शिकलीकर (एकता नगर, नालवे रोड, नंदुरबार) यांनी केल्याचे सांगितले. संशयीताच्या ताब्यातून 49 हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले तर शिकलीकर हा पसार झाला. आरोपीविरोधात यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक अमित माळी, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, अमोल पाटील, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !