अवैध वाळू प्रकरणात अमळनेर तहसीलदारांचे निलंबन


भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निलंबित करण्यात आल्यने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?
मे 2026 मध्ये सावखेडा शिवारात अवैध वाळू वाहतूक व चोरीविरोधात जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात डिझेलसाठाही आढळून आला होता. त्यानंतर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत निमगव्हाण-तांदळवाडी परिसरातील अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अमळनेर व चोपडा तहसीलदारांविरोधात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत निलंबनाची मागणीही करण्यात आली होती. अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. त्यानंतर दोन्ही तहसीलदारांचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात आले.

अमळनेर तहसीलदारांवर थेट निलंबनाची कारवाई झाल्याने महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुराणा यांच्या निलंबनाविरोधात महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !