सातोद शेत-शिवारात काम करणार्या महिलेला सर्पदंश
यावल (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील सातोद गावातील 49 वर्षीय महिलेलला शेत-शिवारात कामादरम्यान डाव्या हाताला सापाने दंश केला. ही घटना रविवारी घडली. तातडीने महिलेला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
शेती कामादरम्यान सर्पदंश
सातोद गावातील रहिवासी सायरा रुस्तम तडवी (40) ही महिला शेतात रविवारी गावालगत शेतात निंदणीचे काम करीत असतांना तिच्या डाव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका सरला वडार, विजय शिंदे आदींनी तिच्यावर उपचार केले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
