अकलूदच्या तापी नदीपात्रात जळगावातील तरुणाचा मृतदेह आढळला


यावल (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील अकलूद या गावाजवळ तापी नदीच्या पात्रात एका 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. मयत तरुण हा जळगाव शहरातील पिंप्राळा येथील हुडको कॉलनीतील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले असून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबास सोपवण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
अकलूद गावाच्या शिवारातील तापी पात्रात मंगळवारी मंगल सोमा सोनवणे (38, पिंप्राळा, हुडको कॉलनी, जळगाव) यांचा मृतदेह आढळला. नागरिकांनी याची माहिती फैजपूर पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, हवालदार विकास सोनवणे, मुकद्दर तडवी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. या ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !