भुसावळात व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरची पूड टाकत सव्वातीन लाख लूटले

काका-पुतण्यावर पाळत ठेवून चोरी : डोक्यात रॉड टाकून क्षणात लांबवली रोकडची बॅग


भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : पुतण्यासोबत घराकडे निघालेल्या धान्य व्यापार्‍याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून क्षणात सिनेस्टाईल गुन्हेगारांनी तीन लाख 15 हजारांची रोकड असलेली बॅग लांबवली. ही घटना शहरातील टी.व्ही.टॉवरजवळ सोमवार, 17 रोजी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे.

पाळत ठेवून लूट झाल्याचा संशय
मित आशिष कोटेचा (19, केळकर हॉस्पीटलजवळ, हनुमान नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, सोमवार, 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 7.45 ते त्यांचे काका अजय प्रेमचंद कोटेजा यांच्यासोबत आनंद ट्रेडींग कंपनी या धान्य दुकानातील कामकाज संपवून घराकडे दुचाकी (एम.एच.19 डी.ए.1522) ने घराकडे निघाले होते. टी.व्ही.. टॉवरजवळ येताच अचानक दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी अजय कोटेचा यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली तर अन्य संशयीतांनी मित कोटेचा यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला व अजय कोटेचा यांच्या पायावर रॉड मारल्याने काका-पुतणे गाडीखाली कोसळले व तितक्यात आरोपींनी तीन लाख 15 हजारांची रोकड असलेली बॅग घेवून पोबारा केला.

तीन जणांविरोधात गुन्हा
भर दिवसा झालेल्या या प्रकारानंतर दोघांनी उपचार घेतले व त्यानंतर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच सीसीटीव्हीच्या आधारे संशयीतांचा कसून शोध सुरू केला आहे. तपास सहा.निरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !