आडगावातील अल्पवयीनाचा विवाह : अत्याचारातून पीडीतेने दिला बाळाला जन्म ; चौघा संशयीतांना अटक
एरंडोल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांनी चौघांनाही अटक केली.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह कमलाकर रमेश भिल याच्यासोबत लावून देण्यात आला. विवाहानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती झाली. त्यानंतर 6 ऑगस्ट 2026 रोजी तिने एका नवजात बालकाला जन्म दिला.
चौघा संशयीतांना अटक
या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दिलीप देवचंद गोकुळ, कमलाकर रमेश भिल, रमेश कौतिक भिल आणि सासू नबाबाई भिल यांना पोलिसांनी आरोपी करीत गुरुवार, 20 ऑगस्ट रोजी पहाटे 12.55 वाजता चौघांना अटक केली. तपास कासोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


