यावल तालुका काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन
धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप
यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण अभियान व फळवाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील बुरूज चौकात उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकुब व कॉग्रेसचे शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकुब यांच्या कार्यालयात माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करीत स्व.राजीव गांधी यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, नगरसेवक निसार मोमीन, समीर खान, उमर कच्छी, मो. अजहर सह मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामिण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. शहरात विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जवाबदारी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली.
यशस्वीतेकरीता काँग्रेसचे शहराध्यक्ष मो.हकीम मो.याकुब, नगरसेवक पराग सराफ, अताऊल्ला खान, अमोल भिरुड, शेख असलम, महिला तालुका अध्यक्ष कल्पना अजय तायडे, गणेश गुरव, फैजपूरचे युवराज भंगाळे, राजू आस्वार, शरद पाटील, शेख नईम, गिरीश देशमुख आदींनी परिश्रम घेतले.


