यावल पोलीस ठाण्यात ईद मिलादुन्नबीच्या आयोजकांची बैठक उत्साहात


यावल (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत झेंडे फिरवताना विद्युत तारांना स्पर्श होत दुर्घटना घडू शकते त्यामुळे प्रत्येकाने याची काळजी घ्यावी, असे आवाहन डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी केले. ते यावल येथे पोलीस ठाण्यात ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या समवेत घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.

समितीची पदाधिकार्‍यांची बैठक
आगामी 26 ऑगस्ट रोजी यावल शहरात ईद मिलादुन्नबी साजरी केली जाणार असून या निमित्ताने शहरात भव्य अशी मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत सहभागी आयोजन समितीच्या पदाधिकार्‍यांची सोमवारी पोलिसांना बैठक घेण्यात आली. या बैठकीत डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मिरवणुकीत मोठ्या संख्येत समाज बांधव नाते पाक पठण करून भव्य मिरवणूक काढतात. या निवडणुकीमध्ये विविध प्रकारचे झेंडे हे लोक फिरवत असतात त्यामुळे कोणाला काही इजा, दुखापत होणार नाही, दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेतली जावी तसेच आक्षेपार्ह घोषणा कुणीही देवू नये, अशा सूचना त्यांनी केल्या.

यांची होती उपस्थिती
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद, आयोजन समितीचे कदीर खान, उमर कच्छी, शेख अश्फाक, माजी नगरसेवक समीर खान, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम, हबीब मंजरसह मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. बैठकीत ज्या-ज्या मंडळाकडून मिरवणुकीत सहभाग घेतला जाणार आहे त्या त्या मंडळाच्या उत्सव समितीकडून पोलीस ठाण्यात अर्ज दिले जावे जेणेकरून चोख बंदोबस्त त्या ठिकाणी दिला जाईल, असे या बैठकीत सुचित करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !