समृद्धी महामार्गावर ओव्हर स्पीड कारला दोन हजार तर जड वाहनांना चार हजार रुपये दंड


मुंबई (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पाऊल उलचण्यात आले आहे. ओव्हर स्पीड कारला दोन हजार तर जड वाहनांना चार हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे शिवाय नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी दर एक किलोमीटर अंतरावर डाव्या आणि उजव्या बाजूला आलटून-पालटून म्हणजेच ‘झिगझॅग’ पद्धतीने हाय-प्रोफाइल सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

रात्रीच्या अंधारातही टीपता येाणर हालचाली
हे कॅमेरे अतिशय उच्च क्षमतेचे असल्याने धुके किंवा रात्रीच्या वेळीही वाहनाची नंबर प्लेट, चालक आणि त्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिपू शकतील. सीटबेल्ट न वापरणार्‍या वाहनधारकांना एक हजार रुपये दंड, लेन कटिंग केल्यास 500 तर ओव्हर स्पीड असलेल्या कारसह हलक्या वाहनांना दोन हजार तर जड वाहनांसाठी चार हजार रुपये दंड होईल. झिगझॅग पद्धतीने हे कॅमेरे बसवण्यात येत आहे. त्याचे नियंत्रण कक्ष अद्याप निश्चित झालेले नाही मात्र ते ठाणे किंवा नागपूर येथे असू शकते. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली नोव्हेंबर महिन्यापासून पूर्णपणे कार्यान्वित होईल.

तर परवानाही रद्द
दोनदा दंड झाल्यानंतर तिसर्‍यांदा नियम मोडल्यास वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

कार व हलक्या वाहनांसाठी ताशी 120 किमीची वेगमर्यादा
वाहनांचा प्रकार लक्षात घेऊन महामार्गावर कार व हलक्या वाहनांसाठी ताशी 120 किमी, बससाठी ताशी 100 किमी आणि जड वाहनांसाठी ताशी 80 किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोनदा दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही तिसर्‍यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. दरम्यान, महामार्गावर नियमभंग करणार्‍या चालकांचा फोटो कॅमेर्‍यात कैद होताच थेट त्यांच्या मोबाइलवर ई-चलान पाठवण्यात येणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !