वरणगाव शहरातील साई बाबा मंदिर ते फुलगाव फाटा रस्त्याची दुरवस्था थांबवा : लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी


भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : वरणगाव शहरातील साई बाबा मंदिर ते फुलगाव दरम्यानचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सा.बां.विभागाला रस्ता दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारक संतप्त
रस्ता नादुरुस्त असल्याने मुक्ताईनगर, तळवेल, पिंपळगाव, आचेगाव, ओझरखेडा, हतनूर, बोहर्डी परिसरात जाणार्‍या प्रवाशांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत पाऊस पडल्यावर गड्डे दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने साई बाबा मंदिर ते फुलगाव फाटा रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी कार्यकारी अभियंता महेश पाटील व विभागीय अभियंता केतन मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




दरम्यान, रस्त्याच्या पाहणी दरम्यान नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते नानाभाऊ चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शेख अकलाख, तालुकाध्यक्ष, शामराव धनगर उपस्थित होते. भोजराज पालवे, कृषी मित्र मिलिंद भैसे, आकाश निमकर, रमेश पालवे, बळीराम दादा सोनवणे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !