आमदार अमोल जावळेंचा अनोखा निर्णय : यावल आगारातील पाच नवीन एसटी बसचे पाच ज्येष्ठांच्या हस्ते लोकार्पण


यावल (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) ः: रावेरनंतर यावल एस.टी. आगारासाठी आमदार अमोल जावळे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून यावल आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या असून या नवीन बससेवेमुळे यावल तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ज्येष्ठांना दिला बस लोकार्पणाचा मान
विशेष म्हणजे, या नवीन बससेवेचा लोकार्पण सोहळा आमदार अमोलभाऊ जावळे यांनी स्वतः न करता यावल शहरातील पाच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पाडला. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बसचे लोकार्पण करून त्यांचा सन्मान करण्याचा आमदार जावळे यांचा निर्णय उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. नारळ फोडून व विधीवत पूजन करून नवीन बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.




आमदार अमोल जावळे यांच्या या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देण्यासोबतच समाजातील ज्येष्ठांच्या अनुभवाला आणि योगदानाला आदर देण्याचा संदेश देण्यात आला. स्वतः लोकार्पण करण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करून त्यांना मानाचे स्थान देण्याची भूमिका आमदार जावळे यांनी घेतली.

यावल आगारातील बसची संख्या अपुरी असल्याने काही मार्गांवर बसफेर्‍या नियमितपणे चालविताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. आता 5 नवीन बस उपलब्ध झाल्यामुळे बसफेर्‍या अधिक नियमित होण्यास मदत होणार असून, प्रवाशांची सेवा अधिक सुलभ व सुविधाजनक होणार आहे.

यावल आगाराला नवीन बस मिळाव्यात यासाठी आमदार अमोल जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने यावलकरांकडून आमदार जावळे यांचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, हर्षल पाटील, छाया पाटील, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, रवींद्र पाटील, गणेश नेहते, विनोदकुमार पाटील, प्रभाकर अप्पा सोनवणे, आर. जी. पाटील, उमेश फेगडे, नंदा महाजन, दीपक पाटील, पवन सराफ, सिद्धेश्वर वाघुळदे, अतुल पाटील, नितीन सोनार, मुन्ना पाटील, राहुल बारी, अतुल भालेराव, आकाश चोपडे, वर्षा चोपडे, उमेश पाटील, योगीराज बराटे, राकेश फेगडे, राजू काठोके, योगिताताई यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, एस.टी. विभागातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवाशांना मिळणार नियमित बससेवा
नवीन पाच एस.टी.बसमुळे यावल तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली, नियमित आणि सोयीची बससेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेल्या या अनोख्या लोकार्पण सोहळ्याचे यावलकरांकडून विशेष स्वागत करण्यात येत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !