सावखेडासीमला मनरेगा कामगारांचे मजुरीचे हप्ते रोजगार सेवकामुळे रेंगाळल्याचा आरोप


यावल (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) :  यावल तालुक्यातील सावखेडासीम या गावातील 136 घरकूल लाभार्थी नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन पंचायत समितीत सोमवारी देण्यात आले. मनरेगा रोजगार सेवकांकडून मस्टर वेळेवर न भरल्या गेल्यामुळे व केवायसी व्यवस्थित न केल्यामुळे त्यांना मजुरीचे पैसे मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मस्टर वेळेत न पूर्ण झाल्याचा आरोप
यावल पंचायत समितीमध्ये सावखेडासीम येथील घरकुल लाभार्थी जहांगीर तडवी, राजू तडवी, आरीफ तडवीसह गावातील 136 घरकुल लाभार्थींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सावखेडासीम गावातील रोजगार सेवक मोहम्मद मुस्तफा तडवी याने घरकुल लाभार्थ्यांचे मजुरीचे प्रत्येकी 21 हजार रुपये काम केल्यानंतर मिळायला पाहिजे होते ते पैसे त्याने मस्टर वेळेवर न पूर्ण केल्यामुळे लाभार्थ्यांना मिळाले नाहीये व तब्बल 136 लाभार्थींचे पैसे अडकले आहे. त्याचप्रमाणे लाभार्थींचे मस्टर भरताना ज्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळाला आहे. त्या कुटुंबाने ज्या मजुरांचे बँक खाते आणि रोजगार कार्ड दिले होते, त्या मजुरांच्या बँक खात्यात पैसे अदा न करता त्याच्या नातेवाईकांच्या खात्यावर पैसे पाठवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात त्यांने त्यांच्या नातेवाईकांना मजुर दाखवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व संबंधित घरकुल लाभार्थ्यांना मजुरीचे पैसे मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



तांत्रीक अडचणीमुळे रावेर तालुक्यातील एकाच्या खात्यावर गेले पैसे
ग्रामरोजगार सेवक मोहम्मद मुस्तफा तडवी यांनी सांगितले की, मोरव्हाल, ता.रावेर येथील एका रोजगाराच्या खात्यावर तांत्रिक अडचणीमुळे पैसे गेले आहेत व ज्या घरकुल लाभार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत त्यांचे कोणाचे केवायसी झालेले नाहीये, कोणाचे आधार बँक खात्याशी लिंक नाहीये या कारणामुळे पैसे त्यांचे अडकले आहेत. कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांना पैसे मिळतील, असे प्रसंगी त्यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !