सावदे गावातील सरपंचाकडे धाडसी घरफोडी : रोख रकमेसह 20 तोळे सोन्याचे दागिने लांबवले


पाळधी, ता.धरणगाव (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) : धरणगाव तालुक्यातील सावदे गावातील सरपंच गोपाल पवार यांच्या घरातून धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी तब्बल 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली. सरपंच पवार राजस्थानवरून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला.

सूत्रानुसार, सरपंच गोपाल पवार हे आपल्या कुटुंबासह राजस्थानातील खाटू श्याम दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. पवार कुटुंबीय गावी नसल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नव्हते.



सरपंच पवार घरी परतल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता, घरातील तिजोरीत ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातच असलेल्या मुसळीचा वापर करून तिजोरी फोडल्याचे तपासात दिसून आले.

घरफोडीनंतर पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सरपंच पवार यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून श्वान पथक संशयितरित्या घराच्या जवळ असलेल्या गल्लीतच घुटमळले. पाळधी पोलिसांनी याप्रकरणी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !