भुसावळातील श्री बडा हनुमान मंदिरात राधाष्टमी उत्साहात


भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : शहरातील श्री बडा हनुमान मंदिरात राधाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे ब्रह्म मुहूर्तात श्री राधाला पंचामृत दशमूल उसाचा रस विविध औषधी वनस्पती यांनी अभिषेक करण्यात आला. दुपारी मध्यान्य काळात महाआरती व भजनांचे गायन झाले. भाद्रपद शुक्ल अष्टमीला राधाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

मंदिर परिसर रोशनाईने उजळला
राधाष्टमीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महाआरतीनंतर पंजरी तसेच विविध फळांचा प्रसाद इतर नैवेद्याचे वाटप करण्यात आले शिवाय संध्याकाळी सात वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठाणाचा 139 व सप्ताह सुरू असल्याने मंदिर आणि परिसरात भक्तिमय वातावरण होते शिवाय श्री बड़ा हनुमान संस्कार पाठशालाच्या विद्यार्थ्यांनी स्तोत्र, श्लोक पठण केले. यशस्वीतेसाठी विमल वैष्णव, भारती वैष्णव, राणी ठाकूर, मयुरी सराफ, पंडित जयप्रकाश शुक्ला आदींनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !