अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुमित बर्हाटे
भुसावळ (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : शहरातील सुमित राजेंद्र बर्हाटे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे व केंद्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाशराव पाटील यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली.
समाजासाठी राजकारणविरहित आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मोलाचा हातभार लावावा, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवा वर्ग तसेच इतर नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करावेत, असेही नियुक्ती पत्रात नमूद आहे.



