भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात
भुसावळ (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलध्ये रक्षाबंधन व संस्कृत दिनम उत्साहात साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑननरी जाँईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, शाळेच्या उपमुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या.
प्रार्थना सभा संस्कृत भाषेत सर्व विद्यार्थ्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांनी जन्मदिनस्य शुभेच्छा संस्कृत भाषेत दिल्या.



बहिण भावाचे नाते द़ृढ करणारा रक्षाबंधन हा सण शाळेतही अत्यंत उत्साहाने विदयार्थ्यासमवेत साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी प्रसंगी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. शाळेतील शिक्षिका तनुजा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व सांगितले. रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेत राखी बनविणे या स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेवून आपले कलागुण दाखविले. इंग्लिश मिडीयम स्कुलमधील सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

