खवशीतील तलावात पिता-पूत्रांचा बुडून मृत्यू

संकटवार : मुलाला वाचवताना पित्यानेही गमावला जीव


अमळनेर (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : अमळनेर तालुकावासीयांसाठी गुरुवार हा संकटवार ठरला. कौटूंबिक कलहातून दामप्त्याने आपल्या दोन चिमुकल्यांसह रेल्वे रूळावर आत्महत्या केली तर दुसर्‍या एका घटनेत 30 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटना ताज्या असताना अमळनेर तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडणार्‍या मुलाला वाचवतांना पित्याचा मृत्यू झाला. वीर अण्णा तलवारे (10) व अण्णा एकनाथ तलवारे (खवशी, ता.अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?
अमळनेर तालुक्यातील खौशी गावातहू आण्णा तलवारे हे आपल्या मुलगा विरेंद्र व कुटुंबासह वास्तव्यास होते. खौशी येथील तलावात विरेंद्र गेल्यानंतर पाण्यात पडून बुडू लागला. मुलाला बुडताना पाहून त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली मात्र दुर्दैवाने या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले.




नागरिकांची धाव
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खवशीसह परिसरात शोककळा पसरली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !