नागलवाडी येथे शॉक लागून प्रौढाचा मृत्यू


चोपडा (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे घरात विद्युत शॉक लागल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुनील वना पाटील (40, रा.नागलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे मृताचे नाव आहे. शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी नागलवाडी येथील राहत्या घरात त्यांना अचानक विद्युत शॉक लागला.



विद्युत शॉक लागल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !