जळगावातील स्वामी नारायण मंदिराची सव्वा कोटीत फसवणूक : गुजरातच्या तिघांविरोधात गुन्हा


जळगाव (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : जळगावातील स्वामी नारायण मंदिराच्या स्वागत कमानी तसेच इतर बांधकामासाठी रक्कम घेवूनही काम न करता तब्बल एक कोटी 26 लाख 25 हजार 500 रुपयात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुजरातच्या तिघांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
प्रमोद वासुदेव झांबरे (69, महाबळ, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत नंदीशभाई मनहरभाई सोमपूरा, किशनभाई मनहरभाई सोमपूरा, मनहरभाई प्रभाशंकर सोमपूरा (तिघे रा.बापा सीताराम निवासम, कृष्ण नगर, मनमोटर्सजवळ, नेत्रामलीसमोर, ईडर, जि.साबरकांठा, गुजरात) यांना जळगावातील स्वामी नारायण मंदिराच्या कमानी तसेच अन्य बांधकामासाठी मंदिर ट्रस्टया वतीने तीन लाख 24 लाख 50 हजार 500 रुपये रक्कम देण्यात आली होती मात्र मंदिराच्या कमानी व अन्य कामे संबंधितांनी पूर्ण केली नाहीत.


बिलाची पाहणी केल्यानंतर संबंधिताना जास्तीची लागलेली रक्कम एक कोटी 26 लाख 25 हजार 500 रुपये स्वतःकडे ठेवून घेण्यात आले व रक्कम परत मागितल्यानंतर संबंधितांनी ती देण्यास नकार देत मंदिराची फसवणूक केली. तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !