अमळनेर तालुक्यात भीषण अपघात : भरधाव स्कूटी डंपरवर आदळल्याने गलवाडेतील दोघे ठार


अमळनेर (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : धावती स्कूटी उभ्या डंपरवर आदळून झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. हा अपघात अमळनेर-गलवाडे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ रविवार, 30 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. पंडित धाकू भील (50) व नागो अमृत सपकाळे (45, दोन्ही गलवाडे) अशी मृतांची नावे आहे.

असा घडला अपघात
सूत्रानुसार दोघे जण रंजाणे येथे प्रसादाच्या कार्यक्रमास स्कूटी (क्रमांक एम.एच.54 इ 764) वर गेले होते. पंडित हे स्कूटी चालवत आताना त्यांचे वाहनाच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने स्कूटी पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपर (क्रमांक एम.एच.18 एम.7857) वर जोरदार आदळली. भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील, मयूर पाटील, गणेश पाटील, अविनाश भदाणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !