माहेरी आलेल्या विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय : चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे 25 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ललिता विजय कोळी (25, रा.बुधगाव, ता.चोपडा, सध्या कोळंबा, ता. चोपडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, विवाहिता ललिता कोळी या कोळंबा येथील वडिलांच्या राहत्या घरी असताना त्यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात आवश्यक कार्यवाही केली. या घटनेची चोपडा ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली.
