जळगावात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर धाड : आंबटशौकीन ग्राहकांसह सहा जणांविरोधात गुन्हा


जळगाव (मंगळवार, 1 ऑगट 2026) : शहरातील पिंप्राळा परिसरातील एका घरातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर स्थानिक मानव तस्करीविरोधी पथक आणि रामानंद पोलिसांनी छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली. यावेळी चार महिलांची सुटका करण्यात आली तर तीन ग्राहक, वेश्या व्यवसाय चालवणार्‍या मालकिण व पुरूषांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा भागात एका घरात बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मानव तस्करीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण परिसराची खात्री करून छुप्या पद्धतीने सापळा रचत अचानक धाड टाकली. यावेळी चार पीडीतांची सुटका करण्यात आली. तीन आंबटशौकीन ग्राहकांना पकडण्यात आले तर हा अनैतिक व्यवसाय चालवणारी महिला व दोन पुरूषांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !