चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेने बिलाखेडची महिला ठार ; दोघे जखमी


चाळीसगाव (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर भरधाव कारने उडवल्याने एका महिलेचा मृत्यू ओढवला तर दोन महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. जखमींना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

एका महिलेचा जागीच मृत्यू
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-मालेगावर रस्त्यावर बिलाखेड गावाजवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने तीन महिलांना उडवल्याने बिलाखेड्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्या पायांना दुखापत झाली.


बिलाखेड गावातील गावकर्‍यांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना महिलांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले व चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. संतप्त गावकर्‍यांनी आंदोलन करीत रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यासह सुरक्षा फलक लावण्याची मागणी केली व रात्री आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !