भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात अभाविंपची कार्यकारीणी जाहीर
भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) भुसावळ शाखेच्या वतीने भुसावळ आर्ट्स, सायन्स व पी. ओ. नाहाटा महाविद्यालयाची नूतन महाविद्यालयीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. महाविद्यालय अध्यक्ष म्हणून लोकेश पाटील, उपाध्यक्ष पूनम बरवे, महाविद्यालय मंत्री वेदिका देसाई तर सहमंत्री नयन सोनवणे व दुर्गेश ठाकरे याना जबाबदारी देण्यात आली. यासोबतच महाविद्यालयातील विविध विद्यार्थी कार्यकर्त्यांवर संघटनात्मक जबाबदार्या सोपविण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विविध विद्यार्थी प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्यासोबतच महाविद्यालय परिसरात सकारात्मक आणि रचनात्मक विद्यार्थी चळवळ उभी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यकारिणी घोषणेवेळी विभाग संयोजक गायत्री पाटील, जिल्हा सहसंयोजक अथर्व जंगले, शहर मंत्री देवेंद्र गोसावी व शहर सहमंत्री महेंद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.



