फोटो व्हायरलची धमकी देत जामनेर तालुक्यातील तरुणीवर अत्याचार
जामनेर (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : इन्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीशी सलगी वाढवत तिला लॉजवर नेत तिचे फोटो काढले व हे फोटो नंतर व्हायरलची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणी संशयीत भूषण रवींद्र पाटील (नेरीदिगर, ता.जामनेर) विरोधात विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मिडीयातून वाढली ओळख
26 वर्षीय पिडीतेसोबत संशयीत भूषणची इन्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटच्या माध्यमातून ओळख झाली होती व ओळख वाढताच संशयीताने विशाल लॉजवर तरुणीला नेत काहीतरी भूरळ घातली व दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हेच फोटो व्हायरलची धमकी देत जबरदस्तीने शारीरीक संबंध निर्माण केल्याचा आरोप आहे. अत्याचाराचा हा प्रकार मार्च 2026 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान घडला. त्रास असह्य झाल्याने तरुणीने जामनेर पोलिसात आरोपीविरोधात तक्रार दिली. तपास सहाय्यक निरीक्षक स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश किर्तीकर करीत आहेत.



