भुसावळात स्व.गोदावरी आईंना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
भुसावळ (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : शहरातील वांजोळा रोडवरील आपल्या परिवार सामाजिक वाचनालयात गुरुवार, 3 सप्टेंबर रोजी स्व.गोदावरी आईंना प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात स्व. गोदावरी आईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.गोदावरी आईंच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक व सेवाभावी कार्याचा गौरव केला. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे तसेच समाजातील विविध घटकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांची आठवण सदैव प्रेरणादायी राहील, असे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रमात जयंत जंजाळे यांनी पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपस्थित वक्त्यांनी स्व.गोदावरी आईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.गोदावरी आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाचनालय समन्वयक शांताराम पाटील आदींची उपस्थिती होती.

