स्वरा भास्कर विरोधात गुन्हा दाखल करा : भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना आक्रमक


भुसावळ (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : 2018 सालच्या ’पद्मावत’ चित्रपटात दाखवलेल्या ‘जौहर’ परंपरेवर अभिनेत्री स्वरा भास्करने टीका करीत महिलांचा अपमान केल्याने देशभरात करणी सेना संतप्त झाली आहे. भुसावळात प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देत स्वरा भास्करविरोधात गुन्हा दाखल करण्याची माणी करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
स्वरा भास्कर यांनी केलेल्या टीकेने राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या असून स्वरा भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करून राजपूत समाजाची जाहीर माफी मागावी, असे निवेदन भुसावळ प्रांताधिकारी यांना करणी सेनेच्या वतीने देण्यात आले.


यांची होती उपस्थिती
प्रसंगी करणी सेनेचे पदाधिकारी दामोदर राजपूत, आनंदा राजपूत, संदीप राजपूत, सारीका राजपूत, हर्षल राजपूत, कविता राजपूत, प्रदीप राजपूत, जयश्री राजपूत, नितीन राजपूत, सुरेश राजपूत, मोहिनी राजपूत, सुवर्णा राजपूत, स्मिता राजपूत, प्रियंका राजपूत, श्रद्धा राजपूत, प्रतीक्षा राजपूत, पंकज राजपूत, गोकुळ राजपूत व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !