सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या : वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून पाऊल उचलल्याचा सुसाईड नोटमध्ये दावा


मुंबई (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. एन. पाटील यांनी ऐरोली येथील एका लॉजमध्ये गळफास घेतला. या घटनेने नवी मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे .

तीन अधिकार्‍यांचा उल्लेख
घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावांचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात तत्कालीन एसीपी, वायरलेस विभागातील एक अधिकारी व आस्थापना विभागातील हेड कॉन्स्टेबल यांच्या नावाचा समावेश आहे.

पी. एन. पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्येही काही अधिकार्‍यांची नावे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकार्‍यांकडून होत असलेल्या कथित त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून कथित सुसाईड नोट आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. सुसाईड नोटमध्ये करण्यात आलेले आरोप आणि त्यातील अधिकार्‍यांची नेमकी भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या आरोपांची अधिकृत पुष्टी तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !