डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात ‘इग्नाइट – 2026’ इंडक्शन सप्ताह प्रारंभ !


जळगाव (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन जळगाव येथे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन च्या नवप्रवेशित विद्यार्थिनींसाठी इग्नाईट इंडक्शन दीक्षारंभ सोहळा) सप्ताहाचे आज उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

विविध उपक्रम नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे वातावरण, अभ्यासक्रम आणि इतर सुविधांची सविस्तर माहिती व्हावी यासाठी या पाच दिवसांत विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.ओरिएंटेशन व कॉलेज ओळख विद्यार्थिनींना कॉलेजचा परिसर, संगणक लॅब, ग्रंथालय आणि शैक्षणिक उपक्रम,ज्येष्ठ विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि नवीन विद्यार्थिनींमधील संवाद वाढवून मैत्रीपूर्ण वातावरण तयार करणे.

ज्ञान व मार्गदर्शन सत्रे: संगणक क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थिनींमधील संकोच दूर करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रम. महिला सबलीकरण व भविष्याचे सक्षमीकरण या ध्येयानुसार विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे उपक्रम.हा सोहळा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. शिवानी महाजन यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !